
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणाऱ्या वारकरी दिंड्यांच्या परिसरात विभागवार चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. धर्मशाळा आणि तंबूत राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी अठरा टॅंकरद्वारे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल. वारकऱ्यांच्या सुरक्षासाठी नगर परिषदेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर बुधवारपासून (ता.११) पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई करणार असल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.