माऊलींच्या पालखी सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण व सुविधा चोख हव्यात - डॉ. राजेश देशमुख

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पायी आषाढी वारी पालखी सोहळा यंदा दि २१ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार
Dr. Rajesh Deshmukh
Dr. Rajesh DeshmukhSakal
Summary

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पायी आषाढी वारी पालखी सोहळा यंदा दि २१ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार.

सासवड, जि. पुणे - कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पायी आषाढी वारी पालखी सोहळा यंदा दि २१ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून दि. २४ आणि २५ जून रोजी संत सोपानकाका महाराजांच्या सासवड नगरीत विसावणार आहे. यंदा निर्बंधमुक्त सोहळ्याच्या नियोजनासाठी मुक्कामाच्या ठिकाणच्या गावात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन, पोलीस यंत्रणा, आळंदी संस्थांच्या वतीने आज सासवडला तयारीसाठी भेट दिली. यंत्रणेला अनेक आदेश व सुचनाही दिल्या.

यावेळी सासवड (ता.पुरंदर) च्या माऊलींच्या पालखीतळावर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मिलींद टोणपे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, यंदाचे पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, उप निरीक्षक विनय झिंजुरके, पालिका मुख्याधिकारी निखील मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, पालिका पाणीपुरवठा अभियंता रामानंद कळस्कर, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, संतोष गिरमे, संभाजी जगताप उपस्थित होते.

सासवड पालखीतळाच्या पूर्वेकडील भागाचे सपाटीकरण सुरु केले असून पुन्हा दुसरा थर मुरमाचा टाकताना पावसाचे पाणी काढून देण्यासाठी पाईप आणल्याचे सांगून काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्याधिकारी मोरे व चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. पालखी येण्यापूर्वी तळाचे उर्वरीत सपाटीकरण, दोनवेळा संपूर्ण स्वच्छता झाल्याचेही ते पालिकेतर्फे म्हणाले. पालखीतळानंतर सासवड येथील क-हा नदीवरील पुलाचे काम व जेजुरीपर्यंतच्या बाकी कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी देशमुख व टिम गेली. पालखीकाळात दिवेघाटापासूनच सासवड परिसरात चोख बंदोबस्त व वाहतुक नियंत्रित करणारी यंत्रणा असेल असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. हडपसरपासून पुढे उरुळी देवाची विसाव्या दरम्यान मार्गावरील साईडपट्ट्यांचे काम गतीने करणे, वडकी विसाव्यालगत चरांची दुरुस्ती करणे, झेंडेवाडीचे स्वागत व तिथला बंदोबस्त चांगल्या करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी या भेटीत दिले.

पालखीसाठी सासवडला पुणे रोडच्या जागेचा पर्याय...

सासवडला संत सोपानदेव ट्रस्टची पुणे रोडच्या हिवरकरमळ्यानजिक मोठी जागा आहे. ती पालखीस किंवा दिंड्यास उतरण्यासाठी देण्याची तयारी ट्रस्टने दाखविली आहे. भविष्यात आशा जागेची गरज लागणार आहे., असे माऊलींच्या पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील जिल्हाधिकारी देशमुख यांना म्हणाले. देशमुख यांनी या प्रस्तावावर विचार करु., असे स्पष्ट केले. तिथे कुळ असल्याने मार्ग काढायला लागेल., असे तहसीलदार सरनोबत म्हणाल्या.

माऊलींचा पालखी सोहळा सासवडला दोन दिवस मुक्कामी असल्याने... येथे पालखीतळावर आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, पोलीस, वीज यंत्रणा, गॅस सिलेंडर पुरवठा, आपतकालीन व्यवस्था चोख ठेवा. त्रुटी नकोत. परीसरातील ज्या विहीरी किंवा उद्भवातून दिंड्यांचे टँकर भरणार.. त्याचे शुद्धीकरण व विहीरींचे अधिग्रहन लवकर करा. फक्त तळाची व्यवस्था नको, तर वाढत्या बांधकामांनी पुढे - मागे दिंड्या जिथे उतरतात., तिथेही सुविधा पालिकेने व इतर यंत्रणेने द्यावेत. दिवस कमी आहेत, कामांना गती द्या.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com