आळंदी, (जि. पुणे) - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी १९ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्या दिवशी नित्याची गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा होईल. रात्री आठनंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या वाटचालीत लोणंद आणि फलटण येथे प्रत्येकी एकच मुक्काम असणार आहे.