
आळंदी : टाळमृदंगाचा टिपेला गेलेला गजर....ज्ञानोबा-माउली नामाचा अखंड जयघोष...देहभान विसरून नाचणारे वैष्णव...पालखीकडे खिळलेल्या लाखो नजरा...अशा भक्तिमय वातावरणात आळंदीकर ग्रामस्थांनी वीणा मंडपातील पालखी खांद्यावर घेतली अन् लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा जयघोष झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने गुरुवारी (ता. १९) रात्री पावणे अकरा वाजता पंढरीकडे प्रस्थान ठेवले.