
भोसरी : वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर सृष्टीचे उद्घाटन आषाढी वारीपूर्वी करण्याचे नियोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. यासाठी प्रशासनाने संत ज्ञानेश्वर सृष्टीत लॉन्स कटिंगसह स्वच्छता आणि इतर दुरुस्त्यांच्या कामास सुरुवात केली आहे. दोनशे फूट उंचीची पताका (वारकरी झेंडा) उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आहे.