संत गाडगे बाबा यांना अभिवादन

संत गाडगे बाबा यांना अभिवादन
Published on

मंचर, ता. २४ : थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बी. पी. गार्डी, डॉ. एम. ए. खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल नारायण निघोट आदी मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी गाडगे महाराजांच्या स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे व कार्याचे आचरण करावे, असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिल निघोट यांनी नुकतीच पीएच. डी. पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सत्यशोधक भाऊराव पाटील हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com