

Palkhi bull receiving treatment after a bull attack during the Wari procession
esakal
चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर: वडगाव निंबाळकर ता बारामती येथे श्री संत गोरोबाकाका पालखी सोहळ्यात बुधवारी (ता. १५) रात्री अनपेक्षित घटना घडली. पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीवर गावातील एका वळूने अचानक हल्ला केल्याने काही काळ परिसरात एकच धावपळ उडाली. ग्रामस्थ, वारकरी आणि पालखी सोहळ्यातील सेवेकऱ्यांनी तत्परता दाखवत बैलांना वाचविले. जखमी बैलावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्रभर लाठी-काठ्या व चाबूक घेऊन बैलांच्या संरक्षणासाठी पहारा देण्यात आला.