संत साहित्य संमेलन

संत साहित्य संमेलन
Published on: 

PNE26W61815
अहिल्यानगर ः संत साहित्य संमेलनात नगरकरांनी भारूड, संतांच्या अभंगांवर सादर झालेला कथ्थक नृत्याविष्कार ‘सखा पांडुरंग’ या नव्या संगीत नाटकाचा आस्वाद घेतला.
----------------
संत साहित्य संमेलनात भक्तीचा जागर
भारूड, अभंग गायन, कथ्थक नृत्याविष्काराची पर्वणी
अहिल्यानगर, ता. २६ ः राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या आर्थिक सहयोगातून व नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नगरमध्ये प्रथम झालेल्या जिल्हास्तरीय संत साहित्य संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक मेजवानीचा नगरकरांनी भरभरून आस्वाद घेतला.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनात भारूड, संतांच्या अभंगांवर सादर झालेला कथ्थक नृत्याविष्कार, जिल्ह्यातील संतांच्या गाजलेल्या अभंगांचे गायन व सखा पांडुरंग या नव्या संगीत नाटकाचा प्रारंभाच्या प्रयोगाने हे संमेलन गाजले. अध्यात्माची व साहित्याची अनोखी सांगड घालत झालेल्या या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना नगरकर श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोजागरी पौर्णिमानिमित्ताने नगरकर रसिकांना या अनोख्या सांस्कृतिक मेजवान्यांची पर्वणी मिळाली.

संत साहित्य संमेलनात सादर झालेले विविध संतांचे प्रबोधनात्मक भारुडांचे सादरीकरण रंगले. ज्ञानमाउली भजनी मंडळाच्या महिलांनी लोक मनोरंजनातून समाजप्रबोधन, अध्यात्म, भक्ती, नैतिकता आणि सामाजिक दोषांवर भाष्य करणारे विविध भारूड येथे सादर केले. डॉ. उज्ज्वला जाधव-भोर, प्रा. डॉ. वर्षा कीर्तने, रामनाथ मुर्तडक, राजेंद्र महाराज नवले, आदिनाथ फाटके हे प्रमुख उपस्थित होते, तसेच भजनी मंडळाच्या अध्यक्षा सुनीता कोळी, उपाध्यक्ष सुरेखा चेमटे, सचिव सुनीता विद्यासागर, लता घुले, आशा काळे, रजनी लिपाणे आदींनी भजन व भारूड सादर केले. सुचित्रा भालेराव यांनी निवेदन केले. कल्पेश अदवंत यांनी संगीत साथ दिली.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध संतांच्या अभंगांचे गायन ‘संत रंगी रंगले’ या कार्यक्रमात प्रसिद्धी गायिका डॉ. धनश्री खरवंडीकर व साथीदारांनी सादर केले. अगस्तीमुनींचा महिमा सांगणारे प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे लिखित अगस्त्य अगस्त्य... या अभंगात संपर्ण सभागृह तल्लीन झाले.
महाराष्ट्रातील संतांच्या अभंग रचनांवर आधारित नृत्याविष्काराचे भक्तिपूर्ण सादरीकरण नृत्यांगणांनी केले. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कल्याणी कामतकर यांनी यांचे आयोजन केले.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com