उरुळी कांचन येथे सावता माळी यांना अभिवादन

उरुळी कांचन येथे सावता माळी यांना अभिवादन
Published on

उरुळी कांचन, ता. १४ : संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३२ व्या पुण्यतिथी निमित्त अखिल माळी समाज संघ, उरुळी कांचन यांच्या वतीने आयोजित केलेला पुण्यतिथी सोहळा श्रीराम मंदिरामध्ये भक्तीमय वातावरणात झाला. सावता महाराजांनी समाजाला आपल्या जीवनातून कर्मनिष्ठा, भक्ती, प्रामाणिक श्रम आणि समतेच्या दिलेल्या संदेशाची आठवण ठेवत या पुण्यतिथी सोहळ्यास पारायणाने प्रारंभ झाला. त्यानंतर सत्यनारायण महापूजा, अभिषेक धार्मिकविधी पार पडला. श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी आणि श्री गुरुदत्त भजनी मंडळ यांच्या वतीने सायंकाळी अभंग, भजन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम झाला. दुपारी संत सावतामाळी महाराज यांच्या मूर्तीवर  पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी सावता महाराजांना अभिवादन केले. सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी उरुळी कांचन व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, समाजबांधव, भजनी मंडळ तसेच असंख्य भाविक उपस्थित होते. अखिल माळी समाज संघाच्या वतीने आयोजित केलेला पुण्यतिथीचा सोहळा उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि भक्तीमय वातावरणात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com