सासवड शहर - संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे सोमवार (ता. २३ जून) सासवड येथील देऊळवाड्यातून सकाळी ११ वाजता प्रस्थान ठेवणार आहे. सोहळा ५ जुलैला वाखरी, पंढरपूर येथे पोहोचणार असल्याचे सोपानदेव समाधी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांनी सांगितले.