
पुणे: तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. 14 ते 16 मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.