
देहू, ५ फेब्रुवारी: संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज (वय ३१) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली असून, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.