
इंदापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात शुक्रवारी (ता. २७) प्रवेश करीत असून सोमवार (ता. ३०) पर्यंत विविध गावांमध्ये विसावणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.