संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ग्रीन कॉरिडॉर करावा - हर्षवर्धन पाटील

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन लाखो वारकरी देह ते पंढरपूरला पायी वारी करीत आहेत.
Harshwardhan Patil and Nirmala Sitharaman
Harshwardhan Patil and Nirmala SitharamanSakal
Summary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन लाखो वारकरी देह ते पंढरपूरला पायी वारी करीत आहेत.

वालचंदनगर - जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन लाखो वारकरी देह ते पंढरपूरला पायी वारी करीत आहेत. वारकऱ्यांसाठी पालखी महामार्ग ग्रीन कॉरिडर करुन भारतातील एक क्रमांकाचा पालखी महामार्ग करण्याची मागणी माजी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जंक्शन (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, राहुल कुल, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा सरचिटणीस तानाजी थोरात, तालुकाध्यक्ष शरद जामदार, रोहित मोहोळकर, गजानन वाकसे, युवराज म्हस्के, सचिन आरडे उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याच्या पंरपरेचा महाराष्ट्राला ४०० वर्षापासूनचा इतिहास आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान ही देहूमध्ये आले होते. सध्या सुरु असलेला संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ३९ गावामधून जात आहे. यासाठी ११०० शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करुन त्यांना बाजारभावापेक्षा ५ पट जास्त पैसे दिले आहेत. सुमारे १ हजार कोटी रुपयांचा जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे. सध्या पालखी महामार्गाचे ४० टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

येणाऱ्या आषाढी एकादशी पूर्वी काम पूर्ण झाल्यास वारकऱ्यांना आनंद होईल. या पालखी महामार्गाने लाखो वारकरी चालत पंढरपूरला जाणार असून संपूर्ण महामार्ग ग्रीन कॉरिडर करावा. रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडेे लावावीत. झाडांच्या सावलीमुळे वारकऱ्यांना उन्हाचा व पावसाचा देखील त्रास होणार नाही. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ग्रीन कॉरिडर झाल्यास देशातील १ नंबर चा महामार्ग होईल असल्याचे सांगितले. देशाच्या अर्थमंत्री प्रथमच इंदापूरमध्ये आल्या होत्या. तालुक्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

इंदापूरचे दळणवळण सोईस्कर

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग व भाजपच्या काळात मंजूर झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग , बारामती-कळंब -बावडा-निरा-नरसिंगपूर (बीकेबीएन) च्या रस्ताची कामे सुरु वेगाने सुरु आहेत.तालुक्यामध्ये दळणवळण सोईस्कर होत आहे.शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

मात्र रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची करण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

अडचणी सोडविण्यासाठी मदत करा

वालचंदनगर मधील वालचंदनगर कंपनी तसेच लासुर्णे,जंक्शन मध्ये होणारे उड्डान पुल, ५४ फाटा येेथे होणार अंडर पास व तालुक्यातील इतर ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी आहेत.अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याची मागणी पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com