
देहू : ‘तुकाराम...तुकाराम’ असा अखंड नामघोष आणि टाळ-मृदंगांच्या निनादात आषाढी वारीहून परतलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता.२१) सायंकाळी चारच्या सुमारास देहूत आगमन झाले. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थ आणि भाविक दर्शनासाठी एकवटले होते. मुख्य देऊळवाड्यात आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.