
देहू : संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा।। जावे पंढरीसी आवडी मनासी।कई एकादशी आषाढी ये।। या अभंगातील ओवीप्रमाणे आषाढी वारीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांनी केलेला टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या नामघोषाने देहूनगरी बुधवारी (ता. १८) दुमदुमली.