
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडवली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन पैकी दोन आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याआधी आरोपी वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी फरार आरोपींच्या अटकेसाठी जलसमाधी आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिसांनी १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले होते. अखेर, आठवड्याभरातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती समोर आली आहे.