
केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेने केज तालुक्यासह जिल्ह्याला हादरवून सोडले होते. घटनेनंतर फरार झालेल्या दोघांना दुसऱ्याच दिवशी दोन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर बुधवारी (ता.११) रोजी या खून प्रकरणाच्या तपासात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आणखी एकास रांजणगाव (पुणे) येथून अटक केली आहे. यावेळी अटक केलेल्या तरूणाचे नाव प्रतिक भीमराव घुले (वय-२५) रा. टाकळी, ता. केज असे नाव आहे.