चास - आखरवाडी या छोट्याशा गावातील संतोष मुळूक यांचे प्राथमिक शिक्षण चास येथील शाळेत झाले. मर्यादित शेती व खाणारे जास्त यामुळे आपले नशीब उजळवण्यासाठी संतोष मुंबईला गेले. मिळेल ते काम करत असताना मुंबईमध्ये आखरवाडीतील त्यांच्याच कुटुंबातील उच्चपदस्थ पोलिस अधिकारी मुरलीधर मुळूक तसेच गोविंदराव मुळूक, शंकर मुळूक यांनी मोलाची साथ दिली.