गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार

गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार
Published on

SGW26B09438
पुणे : सांगोला पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर.


संतोष राऊत यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार

पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरव

सांगोला, ता. ९ : सांगोला पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचा ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ७ मार्च रोजी झालेल्या समारंभात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
संतोष राऊत यांनी ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिराळा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून काम केले. शिराळा येथे कार्यरत असताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग तसेच नागरी व जनसुविधा योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. यशवंत पंचायतराज अभियानात सलग तीन वर्षे पंचायत समितीला पुणे विभागात अग्रेसर ठेवण्यातही त्यांनी यश मिळवले. त्यांच्या प्रयत्नांतून पंचायत समितीला आयएसओ मानांकनही प्राप्त झाले. सध्या पदोन्नतीनंतर संतोष राऊत हे सहाय्यक आयुक्त (चौकशी) म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत.

चौकट : कोविड काळातील प्रभावी नियोजन
सांगोला पंचायत समितीत कार्यरत असताना कोविड काळात ‘ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रीटमेंट’ पद्धतीचा प्रभावी अवलंब करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच २०१९ च्या दुष्काळात टँकरचे नियोजन करून पाणीटंचाईवर मात करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com