जेईई मेन परीक्षेत  पंढरपूरची सारा बोहरी महाराष्ट्रात प्रथम

जेईई मेन परीक्षेत पंढरपूरची सारा बोहरी महाराष्ट्रात प्रथम

Published on

PDR26B09432
सारा बोहरी
---
जेईई मेन परीक्षेत पंढरपूरची सारा बोहरी राज्यात प्रथम
पंढरपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकत्याच जाहीर केलेल्या जेईई मेन पेपर २ए (बी.आर्क) परीक्षेत ९९.९९३३९९६ गुण प्राप्त करीत पंढरपूरच्या सारा शकील अख्तर बोहरी हिने महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर जनरल श्रेणीमध्ये देखील सारा भारतात प्रथम आली आहे. देशभरातून ४५ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सारा हिचे शालेय शिक्षण सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूर येथे झाले असून, दहावीच्या परीक्षेत तिने ९४.८० टक्के गुण प्राप्त केले होते. तर अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मंगळवेढा येथे घेतले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com