९६९ संशोधक विद्यार्थ्यांपैकी ५५८ विद्यार्थ्यांचे सहामाही अहवाल सारथी संस्थेला प्राप्त झाले आहेत. यातील साधारण २५० विद्यार्थ्यांच्या अहवालांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
-प्रज्वल रामटेके
पुणे : ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’च्या (सारथी) ९६९ संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या संशोधक विद्यार्थ्यांना (Research Students) शिष्यवृत्ती देण्यासाठी ७४ कोटींची रक्कम मिळावी, अशी मागणी ‘सारथी’ने वित्त विभागाकडे केली होती. मात्र, वित्त विभागाकडून ४५ कोटी रुपयेच सारथी संस्थेला मंजूर करण्यात आले आहेत.