Pune : पिसोळीतील निसर्गोपचार रुग्णालयाची मंत्री सोनोवाल यांच्याकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : पिसोळीतील निसर्गोपचार रुग्णालयाची मंत्री सोनोवाल यांच्याकडून पाहणी

उंड्री : पिसोळी (ता. हवेली) येथील निसर्गोपचार रुग्णालय व महाविद्यालयाची पाहणी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे, अशा सूचना त्यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील मूळ आयुर्वेदिक, निसोर्गउपचार पद्धतीने रुग्णावर उपचार व्हावेत, या उद्देशाने देशातील पहिले निसर्गउपचार रुग्णालय व महाविद्यालय पिसोळी-येवलेवाडी भागात होत आहे. माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2022 पूर्वी पूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना दिल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष स्नेहल दगडे यांनी दिली.

टॅग्स :Pune Newspune