Hospital
HospitalSakal

सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल दुरुस्ती अंतिम टप्प्यात; प्रसुतिगृह होणार सूरू

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर उपचारासाठी पूर्ण तयारी ठेवली आहे
Published on

कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला सप्टेंबर २०२० मध्ये आग लागून मोठे नुकसान झाले. तेव्हापासून प्रसुतिगृह बंद असल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील महिलांची गैरसोय होत आहे. मात्र, रुग्णालयाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली असून, प्रसुतिगृहासाठीचे ऑपरेशन थिएटर लवकरच सुरू होईल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे यांनी सांगितले.

Hospital
भवानी पेठेत चेंबरमुळे जाऊ शकतो पादचारी, वाहनचालकांचा जीव

डॉ. तपासे म्हणाल्या की, कोरोना महामारीचा काळ सर्वांसाठीच कठीण ठरला आहे. पहिली, दुसरी संपली असली तरी कोरोना संपला नाही. वैद्यकीय तज्ज्ञ तिसरी लाट येणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये आता दररोज २०-२२ रुग्णांची तपासणी केली जात असून, अवघा एक टक्का पॉझिटिव्हचा दर आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील रुग्ण असून, कॅन्टोन्मेंट हद्दीतील एकही रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Hospital
कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दहा हजार किट रवाना

कोरोनाचा ज्वर कमी झाल्यानंतर आता डेंग्यू-मलेरिया साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडी, ताप, अंगदुखी असे कोणतेही आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर उपचारासाठी पूर्ण तयारी ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com