

SKL26B00172
सरकोली (ता. पंढरपूर) : येथे मच्छी मार्केट शेडचे उद्घाटन करताना दत्तात्रय भोसले. यावेळी उपस्थित मान्यवर व मासे विक्रेते.
---
सरकोलीत मासे विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शेड
विक्रेत्यांना सुरक्षित जागा; ग्राहकांचीही गैरसोय झाली दूर
सकाळ वृत्तसेवा
सरकोली, ता. ३ : सरकोली (ता. पंढरपूर) येथील मासे विक्रेत्यांना व्यवसायासाठी सुरक्षित व सोयीस्कर जागा मिळावी तसेच ग्राहकांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मच्छी मार्केट शेडची उभारणी करण्यात आली. याचे लोकार्पण समविचारी आघाडीचे नेते तथा ‘डाळिंबरत्न’ दत्तात्रय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यापूर्वी मच्छी विक्रेत्यांना उन्हाळा, पावसाळा व बदलत्या हवामानात उघड्यावर व्यवसाय करावा लागत होता. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या शेडमुळे विक्रेत्यांना दिलासा मिळणार असून, ग्राहकांनाही खरेदीसाठी सोयीस्कर वातावरण उपलब्ध होणार आहे.
लोकार्पणावेळी शेडचे पूजन करून फीत कापण्यात आली. यावेळी दत्तात्रय भोसले यांनी छोट्या व्यावसायिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले. निश्चित जागेमुळे बाजारपेठेत स्वच्छता व नियोजन राखण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शेडची सुविधा मिळाल्याबद्दल मासे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी सुनील भोसले, प्रवीण भोसले, दीपक भोसले, तुळशीराम भोई, राजेंद्र भोई यांच्यासह ग्रामस्थ, मच्छी विक्रेते, युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.