
पुणे : शिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शनासाठी स्थापन झालेल्या ‘छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्थे’चा (सारथी) कारभार सुमारे दोन महिन्यांपासून व्यवस्थापकीय संचालकांविना सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी रखडली असून, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. त्यामुळे ‘सरकार फक्त घोषणांच्या वल्गना करते, प्रत्यक्षात कृती करतच नाही,’ अशी टीका करत सरकारच्या कार्यक्षमतेवर विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.