Hadapsar News : ससाणेनगर कालव्यावरील पुलाचे काम कासव गतीने; अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा

ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक असल्याचे उघड होऊन दीड वर्षे उलटून गेली.
Repair work on the damaged canal bridge on Sasanenagar Road has been stalled for the past several months.

Repair work on the damaged canal bridge on Sasanenagar Road has been stalled for the past several months.

sakal

Updated on: 

हडपसर - ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक असल्याचे उघड होऊन दीड वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊनही सहा महिने होत आहेत. इतका कालावधी जाऊनही पुलाच्या दुरुस्तीचे काम मात्र जैसे थे अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे येथील वाढत्या वाहतुकीला दिवसेंदिवस गंभीर धोका निर्माण होऊ लागला आहे. याबाबत पालिका पथविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Loading content, please wait...