पुणे - अवघ्या दहा महिन्यांच्या दौंड येथील संपदाला (नाव बदललेले) अचानक श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच खोकलाही सुरू झाला होता. उपचार करूनही त्रास कमी होत नसल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले होते. सीटीस्कॅन तपासणीत तिच्या डाव्या फुप्फुसामध्ये मणी सदृश वस्तू असल्याचे आढळले.