
पुणे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अंतर्गत ससून रुग्णालयात चतुर्थश्रेणी पदाच्या (गट ड, वर्ग ४) १९ संवर्गातील ३५४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. या जागांसाठी २६ ऑगस्टपर्यंत तब्बल १९ हजार जणांनी अर्ज केले आहेत. या पदांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे अर्जांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.