

सासवड, ता. २२ : श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील प्रथम मानाची कावड समजल्या जाणाऱ्या सासवड येथील ‘संत तेल्याभुत्या’च्या कावडीचा पंढरपूर वारी सोहळा झाला. या कावडीने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील संत नामदेव पायरीची भेट घेतली. शिखर शिंगणापूरचा श्रीशंभू महादेव आणि पंढरीचा श्रीपांडुरंग यांची ही हरी-हर भेट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
यावर्षीच्या कावड सोहळ्यात महिला भाविकांचा सहभाग अधिक होता. सासवड ते पंढरपूर या मार्गावर नातेपुते आणि माळशिरस येथे कावडीचे जंगी स्वागत करण्यात आले. माळशिरसमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पंढरपुरात कावड दाखल झाल्यावर शिवयोगी कैलासबुवा कावडे महाराज यांचा मानाचा विडा देऊन सत्कार करण्यात आला.
पहाटे चार वाजता कावडीला चंद्रभागा स्नान घालण्यात आले. त्यानंतर संत नामदेव पायरीजवळ कावडीची आणि श्रीहरीची भेट घडवून आणण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानतर्फे कावडीला मानपान देण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके आणि मंदिर समितीचे मनीष भोंगळे उपस्थित होते. या भेटीबद्दल पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीने कावड संयोजकांचे आभार मानण्यात आले.
पंढरपुरातील विधी आटोपल्यानंतर कावडीने सासवडकडे प्रस्थान केले आहे. परतीच्या प्रवासात फलटण येथील गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. नवनाथ बंडगर यांनी कावडीचे स्वागत केले. महापूजेनंतर रात्री ११ वाजता ही कावड सासवडच्या दिशेने रवाना असल्याची माहिती कैलास कावडे महाराज यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.