सासवड परिसरात कोयता गँगची दहशत

सासवड परिसरात 
कोयता गँगची दहशत
Published on

सासवड, ता. १५ : सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी महामार्ग बाह्यवळण आणि दिवे परिसरात गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री ४० ते ५० बुलेटस्वारांनी हातात कोयते नाचवत आणि गाड्यांचे कर्कश आवाज काढत मोठी दहशत माजवली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या दिवशी समाज माध्यमांवर काही व्हिडिओ प्रसारित झाले. यामध्ये तरुण दिवे घाटात कोयते हवेत फिरवताना आणि बुलेटच्या सायलन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज काढून शांतता भंग करताना दिसत होते. हवालदार सागर कोरडे यांनी या व्हिडिओतील तरुणांची खात्री करून फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com