

सासवड, ता. १ : दिवे (ता. पुरंदर) येथील काळेवाडी पुलाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून २४ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केले व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. ३०) घडली आहे. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अजय शिंदे (वय २४) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अजय भीमराव शिंदे (रा. दिवे, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रतीक शैलेश सोनवणे, सनी शैलेश सोनवणे आणि पलेश मनोज सोनवणे (सर्व रा. दिवे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून अक्षय यास काळेवाडी पुलाजवळ बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी सनी व पलेश यांनी अक्षयचे हात घट्ट धरून ठेवले, तर आरोपी प्रतीक याने कोयत्याने अक्षयच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांवर वार करून त्याला गंभीर दुखापत केली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.