esakal | सासवडचा अर्थसंकल्प १५६ कोटींचा; करवाढ नसतानाही विकास कामांसाठी भरभक्कम तरतूद

बोलून बातमी शोधा

Saswad budget is Rs 156 crore Strong provision for development works in the absence of tax hike}

सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्थायी समितीनंतर आज सभागृहात हा नियोजित अर्थसंकल्प सादर केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे होते. या वेळी उपनगराध्यक्ष निर्मला जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप आणि इतर नगरसेवक, खातेप्रमुख उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन पालिकेचे लेखापाल राजेश नलावडे यांनी केले.

सासवडचा अर्थसंकल्प १५६ कोटींचा; करवाढ नसतानाही विकास कामांसाठी भरभक्कम तरतूद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सासवड : येथील नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला व २५ लाख ९४ हजार ९६० रुपये शिलकीचा सन २०२१- २२ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजूर झाला. सुमारे १५६ कोटी २९ लाख ७३ हजार रुपयांचा हा गृहीत अर्थसंकल्प आहे. सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्थायी समितीनंतर आज सभागृहात हा नियोजित अर्थसंकल्प सादर केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे होते. या वेळी उपनगराध्यक्ष निर्मला जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप आणि इतर नगरसेवक, खातेप्रमुख उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन पालिकेचे लेखापाल राजेश नलावडे यांनी केले.

अपेक्षित जमा व खर्च
मागील शिल्लक- ९१ लाख ८५ हजार ९६० रुपये
महसूली जमा- १९ कोटी ८३ लाख ८२ हजार रुपये
भांडवली जमा- १३५ कोटी ८० लाख रुपये
एकूण अपेक्षित जमा- १५६ कोटी ५५ लाख ६७ हजार ९६० रुपये

महसूली खर्च- २३ कोटी १४ लाख ७३ हजार रुपये
भांडवली खर्च- १३३ कोटी १५ लाख रुपये
एकूण अपेक्षित खर्च- १५६ कोटी २९ लाख ७३ हजार रुपये
एकूण शिल्लक- २५ लाख ९४ हजार ९६० रुपये

अपेक्षित निधी (रुपयांत)
- पंधराव्या वित्त आयोगातून ३ कोटी
- खासदार व आमदार विकास निधीतून प्रत्येकी १ कोटी
- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) ८ कोटी
- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (भुयारी गटर योजना व पाणी पुरवठा योजना) ९३ कोटी
- नावीन्यपूर्ण योजना अनुदान व दलितेतर वस्ती सुधारणा अनुदान प्रत्येकी १ कोटी
- अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून व तीर्थक्षेत्र विकास अनुदानातून प्रत्येकी २ कोटी
- दलितवस्ती पाणी पुरवठा योजना २० लाख रुपये
- रस्ता निधी ४ कोटी
- स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून १५ कोटी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ४ कोटी रुपये

नियोजित विकास कामे
- वीर धरणाहून सासवड शहरापर्यंत वाढीव पाणी पुरवठा योजना
- तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नवीन अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका खरेदी
- रस्ते सफाई व ड्रेनेज सफाईसाठी मशिन खरेदी
- भुयारी गटर योजना दुसरा टप्पा
- शहरातील रस्ते नूतनीकरण
- अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत पालिका कार्यालय इमारत, वीर धरण, कांबळवाडी पंपिंगच्या ठिकाणी व इतर इमारतींवर सोलर पॅनल बसविणे
- आचार्य अत्रे सभागृह नूतनीकरण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात अभ्यासिका करणे
- नक्षत्र उद्यान विकसित करणे