Saswad Court Illegal Arrest : २ तास आधी अटकेची कारणे न दिल्याने आरोपीची तात्काळ सुटका! सासवडमधील हल्ला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' निकालाचा मोठा आधार

सासवड येथील महिला भाजी विक्रेत्यावरील हल्ला प्रकरणात प्रथमेश होले याच्या अटकेला न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर; इतर तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Immediate release of accused for not providing grounds of arrest 2 hours prior

Immediate release of accused for not providing grounds of arrest 2 hours prior

Sakal

Updated on: 

पुणे : जुन्या वादातून एका महिला भाजी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या तरुणाला सासवड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अटकेची लेखी कारणे नियमानुसार २ तास आधी न दिल्याचे निदर्शनास आल्याने, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. गोपलानी यांनी आरोपी प्रथमेश संजय होले याची अटक बेकायदेशीर ठरवून त्याला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. तसेच, या प्रकरणातील इतर तीन आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Loading content, please wait...