

सासवड, ता. १५ : सासवड येथील त्रिमूर्ती मोबाईल शॉपीमधून सुमारे ४५ हजार ६०० रुपये किमतीचा डेमो मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. सानिब मलिक (रा. कुंडा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दिगंबर हेरंब बोरकर (रा. नारायणपूर, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर यांची सासवडमध्ये मोबाईल शॉपी आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारील साई ए वन सलूनमध्ये काम करणारा सानिब मलिक हा नेहमी दुकानात येत-जात असल्याने सर्वांच्या ओळखीचा होता. गुरुवारी (ता. ७) सकाळी १०:४०च्या सुमारास सानिब दुकानात आला होता. तो गेल्यानंतर दुकानातील विवो कंपनीचा ‘एक्स३०० इलाईट’ मॉडेलचा डेमो मोबाईल गायब असल्याचे कामगाराच्या लक्षात आले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, कामगार दुसऱ्या ग्राहकात व्यस्त असताना सानिबने काउंटरवरील डेमो मोबाईल चोरल्याचे स्पष्ट झाले. आरोपीचा फोन बंद असून तो सध्या फरार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.