​सासवडमध्ये विरोधकांचे आंदोलन

​सासवडमध्ये विरोधकांचे आंदोलन

Published on

​सासवड, ता. २ : सासवड नगरपालिकेत शुक्रवारी (ता. २) एकीकडे नवनियुक्त नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांचा पदग्रहण सोहळा पार पडत असताना दुसरीकडे विरोधी गटाने शहरातील ड्रेनेज व्यवस्थेच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेच्या नऊ नवनिर्वाचित नगरसेवकांनी अंगावर निषेधाच्या घोषणा लिहिलेले कपडे परिधान करून मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना तक्रारवजा निवेदन दिले.
हॉटेल मोहिनी परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार करत गुरुवारी (ता. १) रात्री हॉटेल काही काळ बंद ठेवले होते. याच विषयाचे गांभीर्य ओळखून विरोधी गटनेते मंदार गिरमे आणि शिवसेना शहरप्रमुख मिलिंद इनामके यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेतली. शहरात कायमस्वरूपी आणि सक्षम ड्रेनेज व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, प्रितम म्हेत्रे, वैभव टकले यांसह शिवसैनिक तेजस राऊत, अक्षरराज जगताप, संदीप जगताप, सौरभ म्हेत्रे, चंद्रकांत गिरमे, अंकुर शिवरकर, अजित चौखंडे, सुनील पवार आदी सहभागी झाले होते.

गावचे नागरिक आणि व्यापारी यांच्या समस्यांबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भर पावसात किंवा कोणत्याही परिस्थितीत ड्रेनेजची समस्या नागरिकांना सोसावी लागू नये.
- मंदार गिरमे, विरोधी गटनेते, सासवड

शहरातील ड्रेनेज कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला नाही. तो पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल. गुरूवारी लांडगेआळीतील नागरिकांच्या तक्रारीमुळे आम्ही स्थळ पाहणी व पंचनामा केला. हॉटेल बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी सासवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com