सासवडच्या प्रथमेश कडलग याला बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 प्रथमेश विलास कडलग

सासवडच्या प्रथमेश कडलग याला बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक

सासवड : मुंबई येथील विज्ञान अध्यापक मंडळातर्फे आयोजित केलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सासवड (ता. पुरंदर) येथील महाराष्ट्र ए्ज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या प्रथमेश विलास कडलग याला सुवर्णपदक मिळाले.गडकरी रंगयतन ठाणे येथे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सतीश पांडे व डॉ सुनील हांडे यांच्या हस्ते प्रथमेश याच्यासह विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या परीक्षेसाठी इयत्ता सहावी व नववीतील ३७ हजार ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून साडेसात टक्के विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परीक्षेस पात्र झाले. त्यातूनही त्यानंतर १० टक्के विद्यार्थी कृती संशोधन प्रकल्प व तोंडी परीक्षेला उत्तीर्ण झाले. मग यातून शिल्लक व पात्र १० टक्के मुलांना सन्मानित करण्यात आले. यातच प्रथमेश कडलग याला सुवर्णपदक प्राप्त झाले. यापूर्वी ही प्रथमेश यास पाचवी इयत्तेत २७२ गुण मिळून शासनाकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. तो त्यावेळी राज्यात ७ वा, पुणे जिल्ह्यात २ रा व पुरंदर तालुक्यात प्रथम आला होता. यशात खंड न पाडता ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेतही २७२ गुण मिळवून तो शहारी विभागातून राज्यात १३ वा पुणे जिल्ह्यात २ रा तर तालु्क्यात प्रथम आला होता.

त्याच्या यशाबद्दल नुकतेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. भारमळ, उपमुख्याध्यापक डी. आर. रामदासी व पर्यवेक्षक बाळासाहेब जायभाय, संस्था प्रतिनिधी बाबा शिंदे यांनी प्रथमेशचे अभिनंदन केले आहे. सासवड येथील लघुउद्योजक विलास कडलग यांचा प्रथमेश हा मुलगा आहे आहे त्यामुळे त्यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Saswad Gold Medal Prathamesh Kadlag

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspunestudentSakal
go to top