देवडी येथील घरफोडीत ५० हजारांची रोकड चोरी

देवडी येथील घरफोडीत
५० हजारांची रोकड चोरी
Published on

सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील देवडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आत्माराम गेनबा भोसले (रा. देवडी) हे ६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहाच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतात गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घराचे आणि लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील ५० हजार रुपये चोरले. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com