सासवडमध्ये खासगी सावकारीचा उच्छाद

सासवडमध्ये खासगी सावकारीचा उच्छाद
Published on: 

सासवड, ता. १३ : सासवडमध्ये खासगी सावकारीचा एक गंभीर प्रकार समोर आला असून, अवघ्या चार लाख २३ हजार रुपयांच्या कर्जापोटी व्याजासह सात लाख ८४ हजार रुपये वसूल केल्यानंतरही आणखी चार लाखांची मागणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या तक्रारदाराने २०२३ मध्ये प्रदीप अंकुश जगताप याच्याकडून १० टक्के व्याजदराने पैसे घेण्याचे ठरविले होते. यासाठी अंकुश रायचंद माने या मध्यस्थाने ओळख करून दिली होती. या व्यवहारापोटी सासवड येथील गट क्रमांक १२५/३/ब मधील स्वतःची एक आर जमीन तारण म्हणून देत तक्रारदाराने कुलमुखत्यारपत्र करून दिले होते. यानंतर ऑनलाइन आणि धनादेशाद्वारे एकूण चार लाख २३ हजार रुपये कर्ज म्हणून देण्यात आले. ​कर्ज घेतल्यानंतर तक्रारदाराने ३० ऑगस्ट २०२३ रोजी दोन महिन्यांचे व्याज म्हणून ८४ हजार रुपये दिले. पुढे उर्वरित मुद्दल परत करण्याची तयारी दर्शविल्यानंतर कुलमुखत्यारपत्र रद्द करण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार ६ सप्टेंबर २०२३ला तक्रारदाराने आरटीजीएसद्वारे सात लाख रुपये प्रदीप जगताप याच्या खात्यावर जमा केले. ​अशा प्रकारे चार लाख २३ हजार रुपयांच्या मूळ रकमेपोटी व्याजासह एकूण सात लाख ८४ हजार रुपये दिल्यानंतरही जमिनीचे कुलमुखत्यारपत्र रद्द करून दिले नाही. उलट जमीन परत मिळविण्यासाठी आणखी चार लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नारायणराव कांबळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com