सासवड शहर - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवडच्या २०१२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी पूजा राजन मालवणकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक आयुक्त (औषधे) या पदासाठी निवड झाली आहे..शुक्रवारी (ता. १३) अंतिम निकाल जाहीर झाला. मालवणकर यांचे बालवाडीपासून फार्मसी पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण सासवड येथेच झाले आहे. त्यांचे पाचवी ते दहावी वाघीरे विद्यालयात, अकरावी-बारावी पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे पूर्ण करून त्यांनी सासवडमधील फार्मसी कॉलेज येथून २०१२ पर्यंत फार्मसीची पदवी संपादन केली..त्या सध्या अन्न व औषधे प्रशासन, महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत आहेत. अन्न व औषधे प्रशासनाची परीक्षा २०१६ मध्ये त्यांनी दिली. २०१७ मध्ये त्या महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवडल्या गेल्या. प्रारंभी मुंबई येथील प्रयोगशाळेत सेवा बजावल्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रयोगशाळेत झाली..नोकरी व घराची जबाबदारी सांभाळत स्वअभ्यासाच्या बळावर त्यांनी सहायक आयुक्त (औषधे) पदासाठी यश पटकाविले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.