सासवड नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई
सासवड, ता. ६ : शहराच्या विकासासाठी आणि नागरी सुविधा अखंडित ठेवण्यासाठी सासवड नगरपरिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांविरुद्ध मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांचे नळ जोड खंडित करण्यास सुरुवात झाली असून, बड्या थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचा इशारा दिला आहे.
नगरपरिषदेकडून वसुलीसाठी पाच विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. शहरात सध्या ४४४ मालमत्ताधारक असे आहेत ज्यांची थकबाकी २५ हजार रुपयांच्यावर आहे, तर ६४ जणांची थकबाकी एख लाख रुपयांच्याही पुढे गेली आहे. अशा सर्व बड्या थकबाकीदारांवर पालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या नागरिकांची नावे आता शहरातील मुख्य चौकातील डिजिटल फलकांवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. केवळ नळ जोड कापून न थांबता, मालमत्ता जप्त करणे, सील ठोकणे आणि जप्त मालमत्तेची विक्री करणे, अशी कठोर पावले पालिका उचलणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू
नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवारी देखील नगरपरिषद कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, नागरिक ऑनलाइन पद्धतीनेही आपला थकीत कर भरू शकतात.
शहराचा विकास हा नागरिकांच्या करावर अवलंबून असतो. त्यामुळे कायदेशीर कारवाई, नळजोड खंडित करणे किंवा मालमत्ता सील करणे यासारखी कटू पावले उचलण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःहून घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी
06521
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

