

सासवड, ता. ११ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सासवड शहरात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत गटात आहेत, त्यांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित ‘बीएलओ’कडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
नगरपरिषद हद्दीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन डिजिटल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तयार झालेल्या विशेष वर्गवारीतील याद्या सासवड नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर भागनिहाय उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांची नावे या याद्यांमध्ये आहेत, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संपर्क साधावा.
‘‘शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत बीएलओ यांना सहकार्य करावे आणि नागरिकांकडून जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.