Ashadhi Wari : माउलींच्या स्वागतासाठी सासवडनगरी सज्ज

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मंगळवारी (ता. २) दिवे घाटाची अवघड चढण चढून सासवड येथे मुक्कामी असणार आहे. त्यासाठी नगरपालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal

सासवड शहर : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मंगळवारी (ता. २) दिवे घाटाची अवघड चढण चढून सासवड येथे मुक्कामी असणार आहे. त्यासाठी नगरपालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. तर वारकऱ्यांच्या मुक्कामास लागणाऱ्या विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याने सासवडनगरी माउलींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

पालखी तळ नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ करण्यात आले आहे. शहरात रस्त्यांच्या दुबाजूंनी झालरी लावून रोषणाई करण्यात आली आहे. माउलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल त्या परिसरातही रोषणाई केली आहे. बस स्थानकासमोरून पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेच्या वतीने ३ नियंत्रण कक्ष, १ माऊलींचा स्वागत कक्ष, संत सोपानकाका आणि चांगावटेश्वर प्रस्थान कक्ष, हिरकणी कक्ष तयार केले आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासन, महावितरण यंत्रणेने कसून तयारी केली आहे. या काळात शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. परिसरातून येणारे भाविक माउलींचे दर्शन घेतल्यानंतर येथे असलेल्या खेळण्यांचा आनंद घेतात.स्वागत कमानी, भिंतींवर संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्‍वर महाराजांचे अभंग लिहिले आहेत. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. याशिवाय ठिकठिकाणी अन्नछत्र तयार केले आहेत.

चोवीस तास दर्शनाची व्यवस्था

पालखी तळावर २४ तास दर्शन घेण्यासाठी नियंत्रण कक्षाजवळ एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तंबूतील नित्यक्रम, पहाटेची महापूजा, आरती, २४ तास पादुकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी १५०० कर्मचारी, २० स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतील. प्रत्येक दिंडी प्रमुखाला पॉलिथिन पिशवी देण्यात येणार आहे. तर १८ ठिकाणी १८०० स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com