

Alandi police inaction on illegal trade
esakal
आळंदी : आळंदी नगरपरिषद हद्दीमधील इंद्रायणी तीरावर खुले आम महिलांमार्फत मद्यविक्री केली जात आहे. विशेष म्हणजे मद्यविक्री करणारी महिला, मी पन्नास वर्षांपासून दारू विकत असल्याचे सांगत आहे. धार्मिक स्थळांचे विडंबन सध्या अवैध धंदेवाल्यांकडून आळंदी शहरात राजरोस केले जात असल्याचे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सात मावळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका व्हिडिओद्वारे आळंदी शहरातील इंद्रायणी काठावर राजरोस मद्यविक्री कशी चालते हे उघड केले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला इंद्रायणीकाठी कमानीमध्ये बसून गावठी दारू विकत असल्याचे दृश्य आहे. 30 ते 40 बाटल्या एका पिशवीमध्ये आणून ती मध्य विकत आहे, तर सभोवताली मद्यपान करणाऱ्या तरुणांची रेलचेल दिसून येत आहे.