उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
Published on

जिल्हा बॅंक भरतीवरील स्थगिती उठवावी

उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; जिल्ह्यातील विविध प्रश्नांचे निवेदन

सातारा, ता. २० : एनसीईआरटी अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा वगळलेला नकाशाचा पुन्हा समावेश करावा, जिहे-कठापूर योजनेचा नाबार्ड योजनेत समावेश व्हावा, जिल्हा बॅंकेच्या भरतीवरील स्थगिती उठवावी, बेलापूर किल्ल्याची पुरातत्त्व विभागाकडून डागडुजी करावी, शासकीय अभिलेखात ‘सतारा’ शब्द बदलून तो सातारा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करावा, सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, सैनिक स्कूलच्या बांधकामाला पर्यावरण विभागाचा परवानगी मिळावी, तसेच विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून फीमध्ये सवलत मिळावी आदी मागण्यांचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्याबाबतचे निवेदन दिले, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर निवेदन दिले. यावेळी सातारा लोकसभा महायुतीचे समन्वयक सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीचे सदस्य ॲड. विनीत पाटील, लक्ष्मण कडव, चिन्मय कुलकर्णी, अविनाश माने, यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने संबंधित विभागाला निर्णय घेण्यास सांगण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजेंना दिले.

उदयनराजेंनी केलेल्या मागण्या

सातारा जिल्हा बॅंकेची नोकरी भरतीवरील स्थगिती तत्काळ उठवावी.
एनसीईआरटी अभ्यासक्रमात पुन्हा मराठा साम्राज्याचा नकाशा सन्मानाने समाविष्ट करावा.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेचा नाबार्डच्या योजनेत समावेश करण्यात यावा.
ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती करून घ्यावी.
केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या अभिलेखात देवनागरीमध्ये ‘सातारा’ असा बदल करून घ्यावा.
सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा.
सातारा सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘फी’मध्ये राज्य शासनातर्फे सवलत देण्यात यावी,
तसेच शाळेच्या संरक्षक भिंतीच्या शेजारील रस्त्यांचे रुंदीकरण, शाळेच्या बांधकामाला पर्यावरण विभागाची मान्यता द्यावी.
..................................
PNE26W20738
मुंबई : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना खासदार उदयनराजे भोसले, त्यावेळी सुनील काटकर, काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, लक्ष्मण कडव, चिन्मय कुलकर्णी, अविनाश माने आदी.
.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com