मालकाला नकोशा झालेल्या वडाला सह्याद्री देवराईकडून साताऱ्यात जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालकाला नकोशा झालेल्या वडाला सह्याद्री देवराईकडून साताऱ्यात जीवदान
मालकाला नकोशा झालेल्या वडाला सह्याद्री देवराईकडून साताऱ्यात जीवदान

मालकाला नकोशा झालेल्या वडाला सह्याद्री देवराईकडून साताऱ्यात जीवदान

पुणे : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन राहावे म्हणून सोमवारी (ता. १४) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत म्हसवे (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येणार आहे.(Pune Latest Marathi News)

श्रीगोंदा येथील पानसरे नर्सरीचे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. तर पुनर्रोपणाबाबत अधिक माहिती देताना अभिनेते व संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘‘अडचण होत आहे, असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे याचे पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी

व्हॅलेंटाइन डे’ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे कोडकौतुक करणार आहोत.’’

वड हा राष्ट्रीय वृक्ष असून त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत गाणी गायली जाणार आहेत, नृत्य केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

संस्थेचे विश्वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, ‘‘वडासारख्या मोठया झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हीच जनजागृती आणि संदेश लोकांपर्यंत पोचावा म्हणून व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.’’

Web Title: Satara Banyan Tree Sahyadri Vanrai Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..