पुणे- सातारा रस्ता बीआरटीसाठी आता 2020 चा मुर्हूत

Satara BRT road
Satara BRT road
Updated on

पुणे-  सातारा रस्त्यावर ‘बीआरटी’ मार्ग सुरू करण्यासाठी महापालिकेने आता पुढील वर्षी मार्चचा नवा वायदा केला आहे. यापूर्वी केलेले दोन वायदे हवेतच विरले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचा कूर्मगतीचा कारभार या प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा उघड झाला आहे.

बीआरटी प्रकल्पाबाबत महापालिका, पीएमपी आणि बीआरटी सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. त्यात सातारा रस्त्यावरील बीआरटी कार्यान्वित करण्यासाठी आता मार्च २०२०चा मुहूर्त महापालिकेच्या पथ विभागाने जाहीर केला आहे. 

या रस्त्यावर कात्रज ते जेधे चौकादरम्यान एकूण १० स्थानके उभारण्यासाठी २७ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. यापैकी सात स्थानके उभारली गेली आहेत. परंतु स्वयंचलित दरवाजे उभारणे, त्यावर एलईडी डिस्प्ले बोर्ड लावणे, प्रवासी केंद्रित सुविधा निर्माण करणे आदी कामे होणे अपेक्षित आहेत. त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. परंतु बसथांब्यांचीच कामे रखडल्यामुळे स्वयंचलित दरवाजे किंवा एलईडीची कामे अजून बाकी आहेत. 

बीआरटी मार्गावरील  दुभाजकांच्या रचनेबाबतही नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. परंतु पथ विभागानेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे काणाडोळा केला आहे.

बीआरटी मार्गांसाठी उपयुक्त ठरतील अशा बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊ लागल्या आहेत. शहरातील अन्य बीआरटी मार्ग कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेशी सातत्याने चर्चा सुरू आहे. 
- अनंत वाघमारे, व्यवस्थापक, पीएमपी

कात्रजवरून रोज मी शिवाजीनगरला जातो. बीआरटी असल्यास बस अवघ्या १०-१२ मिनिटांत स्वारगेटला पोचत होती. आता किमान २० मिनिटे लागतात. त्यामुळे बीआरटी लवकर सुरू व्हायला हवी.
- अभिजित वाळके, प्रवासी

सातारा रस्त्यावरील बीआरटीचे थांबे, मार्गाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरीस पूर्ण होऊ शकेल, असे वाटते. त्यादृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत. 
- अनिरुद्ध पावसकर,  प्रमुख, पथ विभाग, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com