भिलार : महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची ८ मार्चला निवड चाचणी; नितीन भाई भिलारे यांचे खेळाडूंना आवाहन
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी
रविवारी जिल्हा संघाची निवड
भिलार, ता. ५ : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरुष खुला गट फुटबॉल स्पर्धेसाठी सातारा जिल्हा फुटबॉल संघटनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची निवड करण्यासाठी येत्या रविवारी (ता. ८) दुपारी ३ वाजता सातारा येथील शानभाग स्कूलच्या मैदानावर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख आणि अनुभवी फुटबॉलपटूंना राज्याच्या नकाशावर साताऱ्याची मोहोर उमटवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्याचा एक प्रबळ आणि शिस्तबद्ध संघ तयार करण्याच्या उद्देशाने ही चाचणी प्रक्रिया राबविली जात आहे. नितीन भाई भिलारे यांनी जिल्ह्यातील जास्तीतजास्त फुटबॉलप्रेमी खेळाडूंनी या चाचणीला वेळेवर उपस्थित राहून आपले कसब दाखवावे, असे आवाहन केले आहे. निवड चाचणीबाबत काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खेळाडूंनी रामनाथ वायफळकर किंवा प्रा. गौरव जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

