

शौर्यगाथांच्या देखाव्यांमुळे इतिहासाला उजाळा
साताऱ्यातील गणेशोत्सवाचा उत्साह टिपेला; सायंकाळनंतर भाविकांची वाढती गर्दी
सातारा, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाने व शौर्यगाथांनी जिवंत केलेल्या देखाव्यांच्या माध्यमातून जेव्हा इतिहास डोळ्यांसमोर उभा ठाकतो, तेव्हा उपस्थित शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने आणि भावुकतेने भरून येत आहे.
गणेशोत्सवाचा आनंद टिपेला पोहचल्याचे चित्र शहर व परिसरात आहे. उंच गणेशमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची सर्व पेठांमधील रस्त्यांवर गर्दी होऊ लागली आहे. सायंकाळनंतर शहरातील शनिवार पेठेत भाविकांची गर्दी समुद्राप्रमाणे पूर्णपणे फुलून जात आहे. लहान मुलांना खांद्यावर घेऊन, गर्दीतून वाट काढत कुटुंबे शिस्तीत गणरायाच्या दर्शनासाठी पुढे जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आकर्षक सजावटी, उंच गणेशमूर्ती हे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केला जातो; परंतु गर्दीमुळे शक्य होत नसते, तरी देखील देखाव्यांच्या परिसरात गर्दीसोबत युवा वर्गाचा, कुटुंबांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देखावे पाहून थकून भागून भाविकांची पावले राजवाडा येथील चौपाटीकडे वळत होती. पाणीपुरी, भेळ, पावभाजी आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना कुटुंबे दिसत होती. गरम मसाले दूध, आइस्क्रीम यावरही लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण ताव मारताना दिसत होता.
.........................................
शिवेंद्रराजेंनी दिल्या मंडळांना भेटी
गणपतीच्या आगमनानंतरच्या पहिल्याच रविवारी उत्सवाचा माहोल शिगेला पोहोचल्याचे चित्र होते. त्यातच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही रविवारी गणेश मंडळांना भेटी देण्याचे नियोजन केले. रस्त्यावरील गर्दीचा अंदाज लक्षात येताच त्यांनी दुचाकीवरून शहर व परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेत मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भोसले यांनीही विविध मंडळांचे जिवंत देखावे आवर्जून थांबून पाहात कलाकारांचे कौतुक केले.
...................................
पोलिस अधीक्षकांशी संवाद
या दौऱ्यातच मंत्री भोसले यांनी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पिंगळे व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
..................................
फोटो :.........PNE26W51719
..................................
कोठे काय पाहाल?
श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ, गुरुवार पेठ
एक झुंज वादळाशी (छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा थरार)
-------------------------
मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, राजपथ.
राजमाता जिजाऊंचे धैर्य आणि शिवबाची बुद्धिमत्ता.
-------------------------------------
सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ
मराठी शाळा जगली पाहिजे.
-------------------------------------
बालविकास गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ.
भगवान तिरुपती बालाजी (श्री व्यंकटेश्वर स्वामी) यांच्या उत्पत्तीची कथा.
-------------------------------------
फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ.
स्त्री शक्तीचा जागर.
----------------------------------------------
अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ.
अन्न भेसळ व अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्णय.
---------------------------------------
श्री गजराज गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ
रणधुरंधर सरसेनापती प्रतापराव गुजर वेडात वीर मराठे दौडले सात.
-------------------------------------
समर्थ गणेशोत्सव मंडळ, समर्थ मंदिर
मोहीम महिषासूर मर्दिनी (महिला अत्याचारासंदर्भात).
------------------
PNE26W51716 आणि PNE26W51717
सातारा : राजमाता जिजाऊंचे धैर्य आणि शिवबाची बुद्धिमत्ता या विषयावर आधारित मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाने साकारलेला देखावा. दुसऱ्या छायाचित्रात देखावा पाहण्यासाठी राजपथावर झालेली गर्दी. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.