उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी
Published on: 

साताऱ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांचा प्रतिसाद
सातारा, ता. १७ : जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित असून, उद्योजकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, अशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
साताऱ्यात श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा उ‌द्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, ‘‘सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे.’’ उद्योजकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Satara Industrial Growth Gets Major Boost With 46000 Crore Investment 126 New Industries And 12000 New Job Opportunities
Marathi News Esakal
www.esakal.com